राज्यात डाळींचा दर वाढले ; पहा किती झाली वाढ !

बातमी शेअर करा

कृषीसेवक |  ३१ ऑगस्ट २०२३| राज्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट आले असून आता पावसाचा परिणाम आता कडधान्याच्या शेतमालावर देखील होऊ लागला आहे. आता बाजारात सर्वच खाद्य वस्तूंचे भाव वाढताना दिसत आहेत. डाळींचा देखील आता दराचा वर जाताना पाहायला मिळत आहे. लातूर बाजार समितीत तुरीची आवक कमी असल्याने दरात वाढ दिसून येत आहे. यामुळे जनतेच्या बजेटमध्ये वाढ होणार आहे.

लातूर बाजारात बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा १७५ रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ (Toor Dal) महाग झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी हीच डाळ १०० रुपये किलोवर होती. आता या डाळीची किमत १६० ते १७५ रुपये किलो झाली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कडधान्यांनी चांगला भाव खाल्ला होता. कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ झाल्याचीही नोंद आहे.
तूरडाळ दोन महिन्यांत १०० ते ११० रुपयांवरुन १६० ते १७५ रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ ५८ रुपयांवरुन ७० रुपये प्रति किलोवर गेली आहे. उडीद डाळ ९० रुपयांवरून ११० रुपये प्रतिकिलो झाली आहे. तसंच मसूर डाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूग डाळ ८५ रुपयांवरुन ११० रुपयांवर गेली आहे. दरम्यान, देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम