राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस कोसळण्याची शक्यता -पंजाबराव डख

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ ऑक्टोबर २०२२ |आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांच्या मते 19 तारखेपासून म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे. आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीत उद्याचा दिवस पावसाचा राहणार आहे.

19 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव यांनी दिली आहे. याशिवाय 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या द्राक्ष पट्ट्यात पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी नमूद केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम