अशी करा लेमन ग्रासची शेती

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १३ डिसेंबर २०२२ I लेमन ग्रास ही एक औषधी वनस्पती आहे. लेमन ग्रासचा वापर कॉस्मेटिक, डिटर्जंट, आणि औषधांमध्ये केला जातो. लेमन ग्रास हे लागवडीनंतर चार महिन्यांमध्ये तयार होते. त्यापासून बनवलेल्या तेलाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात लेमन ग्रासला मोठ्या आणि चांगल्या प्रकारे मागणी आहे. विशेष म्हणजे लेमनग्रासची शेती करताना कुठल्याही प्रकारच्या खताचीची गरज नसते. त्यामुळे लेमन ग्रासची शेती ही खूप फायद्याची आहे .

लेमन ग्रास लागवडीचा योग्य काळा फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो. एका हेक्टर मध्ये लेमन ग्रासची शेती करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये लागतात. एकदा लेमन ग्रास पेरल्यानंतर कमीत कमी सहा ते सात वेळा यांची कापणी केली जाते. लेमन ग्रास लावल्यानंतर एका वर्षात तीन ते चार कापण्या होतात त्यामुळे लेमन ग्रास या शेतीतून एका वर्षात तब्बल 1 लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

तयाच बरोरब यातून तेल काढले जाते. एका एकरातून निघणाऱ्या तेलाचा विचार केला तर तीन ते पाच लिटर तेल निघते. ह्या एका लिटर तेला ची किंमत हजार ते दीड हजार रुपये आहे.

लागवडीनंतर कमीतकमी तीन ते चार महिन्यांनी पहिली कापणी केली जाते. लेमन ग्रास तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा गंध घ्यावा लागतो. जर गंध हा लिंबा सारखा आला तर लेमन ग्रास तयार झाले आहे असे समजले जाते.

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम