रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज 25 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | वाघुर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा या प्रकल्पावर शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत / अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 15 ऑक्टोंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन खालील अटीस अनुसरून पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी खालील अटीच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अजांवर मागणी करून पाणी अर्ज 25 नोव्हेंबर, 2022 च्याआंत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष जमा करावेतृ

सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील.

उन्हखरीप हंगाम सन 2022-23 अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अजांच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रसच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल, पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल.

उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे आदेश क्र. 1 /2018 दिनांक 11 जानेवारी 2018 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे उप कार्यकारी अभियंता वाघुर धरण विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम