पुणे जिल्ह्यात २४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ | गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिना होत आला आहे. या कालावधीत साखर कारखान्यांनी गाळप बऱ्यापैकी केले आहे. पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३१ पैकी २४ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयातील सूत्रांनी दिली.शेतात पाणी साचल्याने तोडणी करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे अडचणी येत असून येत्या पंधरा दिवसांनंतर गाळपास गती येणार असल्याची माहिती साखर कारखानदारांना दिली.

चालू वर्षी १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरूवात केली. मात्र तरीही साखर कारखाने हळूहळू सुरू होत आहेत. परतीच्या पावसाने गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या. अनेक ठिकाणी उसात पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली. त्यामुळे गळीत हंगाम धिम्या गतीने सुरू होत आहे. जुलैपासून फडात पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उत्पादनात घट होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम