कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ | ऊस दरावरून सध्या शेतकरी आक्रमक पवित्रा घेत आहेत. आता रयत क्रांती संघटनेनं ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत.
रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. यामुळे वातावरण तापले होते.
रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम